Description
डॉ. स्वरजा साळस्कर- जाजे या संस्कृत, भारतीय ज्ञानपरंपरा व हिंदू
अध्ययन क्षेत्रातील संशोधक व अध्यापिका आहेत. त्यांनी महाराजा
सयाजीराव विश्वविद्यालय, बडोदा येथून ऑक्टोबर २०२४ मध्ये संस्कृत
विषयात पीएच.डी. पदवी संपादन केली. त्यांचा प्रबंध नव्यन्याय
परंपरेतील मौलिक चिंतनकार व दार्शनिक रघुनाथ शिरोमणि विरचित
‘आख्यातवाद’ या ग्रंथाच्या समीक्षात्मक संपादनावर आधारित असून
शाब्दबोध, आख्यातार्थ व भारतीय तत्त्वज्ञानपरंपरेतील मतभेदांचा सखोल
अभ्यास त्यात करण्यात आला आहे.









Reviews
There are no reviews yet.